Sunday, August 23, 2026
Homeब्लॉगकार्ला लेणीतील स्तंभशीर्ष ..!

कार्ला लेणीतील स्तंभशीर्ष ..!

इ स पुर्व पहिल्या शतकापासून कोरणयास सुरूवात झालेल्या लेणीत सलग चार पाचशे वर्षे निरंतर इथे घडवणुकीचे काम सुरू होते , कार्ला लेणीत शिल्पकलेचे वैशिष्ट्ये म्हणजे इथले स्तंभ शीर्ष ( Capital’s ) .
कुंभात स्तंभांना उभे करून या लेणीचा भार त्या स्तंभांनी उचलला आहे छताला या स्तंभांनी आधार दिला आहे असा आभास निर्माण करणाऱ्यास इथे कलाकार यशस्वी झाले आहेत खरंतर लेणीत स्तंभांची गरजच नसते ( बिना स्तंभांचे लेणीतील विहार आपण पाहू शकतो. ) पण गत काळात असे चैत्य, विहार, घरे , राज प्रसाद आणि इमारती लाकडात तयार केल्या जात होत्या म्हणून त्याचीच पुनरावृत्ती लेण्यात सह्याद्रीच्या डोंगर खोर्‍यात बारकाईने कोरून घेण्यात आली आहे .
लेणीच्या प्रांगणात पूर्वीच्या काळी इमारतींना जसे सज्जे होते गच्ची होती त्याच प्रकारे अलंकृत करून लेणी सजवण्यात आली आहे हे अलंकारन म्हणजे गत वैभवाचे प्रतिबिंब असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
लेणीतील कुंभात उभे केलेले स्तंभ आणि त्यावरील शीर्ष म्हणजेच गत वैभावाची प्रचितीच प्रत्येक स्तंभ शीर्षयावर स्त्रियांच्या जोड्या व स्त्री पुरुषाची अशी जोडी देखील आपण पाहु शकतो पुरूषांनी जर स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवले आहे तर स्त्री देखील पुरूषाच्या खांद्यावर हात ठेवले आहे हे घोतक आहे त्या काळच्या समानतेचा त्या काळी स्त्री पुरुष हे समान पातळीवर होते म्हणूनच त्याचे अलंकारन आपण लेण्यात बारकाईने पाहु शकतो स्त्री पुरुष जोडीने हत्ती वरून विहार करण्यास सज्ज झाले आहेत असा काहीसा प्रसंग दिसुन येतो तर समोरच्या उजवीकडच्या आणि डावीकडच्या स्तंभांची रांग आहे समोरून हत्तीवर दोन स्त्रिया एकत्रित किंवा स्त्री पुरुष हत्तीवर दिसुन येतात ( हत्तींच्या दातांची पोकळी आजही पोकळ आहे पूर्वी त्यात खरे दात किंवा इतर माध्यमातून तयार केलेले दात बसवले जात होते तर मंगल प्रसंगी हे शिल्प सजवले देखील जात होते ) तर मागच्या बाजूने घोड्यावर आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांवर बसलेले आपण पाहू शकतो मागच्या बाजूला असल्याने पर्यटक शक्यतो इकडच्या बाजूला फिरकत नाही तसेच एका स्तंभ शीर्षावर आपण spinx देखील पाहु शकतो पुढच्या एक स्तंभावर “धम्म चक्र” अलंकृत केले गेले आहे मागची बाजू असल्याने अंधार असल्याने हे सर्व शिल्प वैभव दृष्टीपथास पडत नाही पण लेणीला बोलती करावी लागते तिच्याशी हितगुज करावे लागते तर इथला प्रत्येक शिल्प सजीव होतो आणि आपल्याशी संवाद साधतो…. असेच एखाद्या लेणीशी शिल्पाशी संवाद साधण्यासाठी दोन दिवसीय “अभ्यास दौरा” आम्ही आयोजित केला आहे जो निःशुल्क आहे भारतीय नागरिक म्हणून या दौर्‍यात कोणीही समाविष्ट होऊ शकतो तर खालील नंबरवर तुम्ही तुमची संपूर्ण माहिती व्हॉट्स अप करायची आहे…. चला तर मग लवकरच भेटू सह्याद्रीच्या कुशीतील शिल्प वैभव उलगडण्यासाठी !

सूरज रतन जगताप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments