
[ad_1]
मुंबई आणि अहमदाबाद मार्गावरील पहिला टप्पा २०२६ पर्यंत कार्यान्वित झाल्यानंतर एकामागून एक अन्य टप्पे सुरू करण्यात येतील. बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये ‘मर्यादित थांबे’ आणि ‘सर्व थांबे’ अशी सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. मर्यादित थांब्यांसह बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण करू शकेल. तर, इतर सेवांमध्ये हेच अंतर सुमारे २ तास ४५ मिनिटांत कापले जाऊ शकेल. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत १२ स्थानके असतील. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) यांच्या माध्यमातून अंमलबजावणी केली जात आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
[ad_2]
Source link
