Bopdev Ghat : बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तपासले तब्बल ३ हजार मोबाइल क्रमांक, २०० पेक्षा अधिक गुंडांची झडती

0
2
Bopdev Ghat  : बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तपासले तब्बल ३ हजार मोबाइल क्रमांक, २०० पेक्षा अधिक गुंडांची झडती


Bopdev Ghat rape : पुण्यात बोपदेव घाटात मित्रासोबत गुरुवारी रात्री ११ वाजता टेबल पॉइंट फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याने खळबळ उडाली होती. आरोपींनी दोघांना कोयत्याचा आणि चाकूचा धाक दाखवला व त्यांच्या जवळील वस्तु लुटल्या. त्यानंतर तरुणाला बांधून तरुणीला दुसरीकडेनेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींचे स्केच तयार केले आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन दिवसांत तब्बल ३ हजार मोबाइल क्रमांक तपासले आहेत. या सर्व फोन कॉल्सची तांत्रिक माहिती घेतली जात आहे. या सोबतच पोलिसांनी २०० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांची देखील चौकशी केली आहे.



Source link