Bigg Boss 17: सुशांत माझ्या आयुष्यात परत येईल अशी आशा होती! अभिनेत्याच्या आठवणीत अंकिता भावुक

0
18
Bigg Boss 17: सुशांत माझ्या आयुष्यात परत येईल अशी आशा होती! अभिनेत्याच्या आठवणीत अंकिता भावुक


Bigg Boss 17 Latest Update:बिग बॉस १७‘चं पर्व सध्या टीव्हीवर चांगलंच गाजत आहे. या शोमध्ये रोजच काहींना काही वेगळं नाटक आणि स्पर्धाकांचा ड्रामा पाहायला मिळत आहे. आता या शोमध्ये मुनव्वर फारुकीची कथित एक्स-गर्लफ्रेंड आयशा खान हिची एंट्री झाली आहे. यानंतर आता मुनव्वर खचून गेल्याचे या शोमध्ये पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे, मुनव्वरची गर्लफ्रेंड नाझिला हिने लाईव्ह येत आपल्या ब्रेकअपची घोषणा केली होती. या दरम्यान आपला अनुभव सांगताना अंकिता लोखंडे पुन्हा भावुक झालेली पाहायला मिळाली आहे. अंकिता म्हणाली की, ‘मी माझ्या आणि सुशांतच्या ब्रेकपबद्दल कुणालाच काही सांगितले नव्हते. कारण तो माझ्या आयुष्यात परत येईल, अशी आशा मला होती.’



Source link