Wednesday, September 30, 2026
Homeसाताराभिवंडी संकेत भोसले हत्येच्या निषेधार्थ फलटण बंद ; नायब तहसीलदार यांना निवेदन

भिवंडी संकेत भोसले हत्येच्या निषेधार्थ फलटण बंद ; नायब तहसीलदार यांना निवेदन

फलटणःदि. २६ : भिवंडी (मुंबई) येथील संकेत भोसले या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी फलटण येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी भीमसैनिक व समाज बांधवांच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गावरून जनक्षोभ मोर्चा काढून या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या संशयितांची सखोल चौकशी करून दोर्षीना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

भिवंडी, मुंबई येथे किरकोळ वादातून संकेत भोसले या १६ वर्षीय युवकास बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संकेत भोसले याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणाचे तीव्र संतप्त पडसाद राज्यभरात उमटले असून या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी फलटण बंदचे आवाहन करण्यात आले होते, त्यास प्रतिसाद देत फलटण शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळून बंदच्या आवाहनास समर्थन दर्शविले.

सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिभवन येथून भीम सैनिकांचा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी संकेत भोसलेला न्याय मिळालाच पाहिजे, संबंधित संशयित आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या

या निवेदनात असे म्हटले आहे की, भिवंडी येथील दलित समाजातील अल्पवयीन युवक संकेत भोसले याची शुल्लक कारणावरून निघृण हत्या केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण दलित समाज पेठून  उठला आहे. कॉलेज मधील किरकोळ वादातून हे हत्याकांड झाले आहे. संकेत भोसले या युवकास अपहरण करीत गंभीर मारहाण झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तरी या प्रकरणातील सर्व आरोपीना कडक शासन झाले पाहिजे, व त्या आरोपींवर मोक्का UAPA या कायद्यांतर्गत कारवाई करून संकेत भोसले यास न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी फलटण बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. तरी या भीमसैनिकाला न्याय मिळावा आणी त्याच्या कुटुंबाच पुनर्वसन करण्यात यावे अशी विनंती या निवेदनात शेवटी करण्यात आली आहे.

आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, तरुण, महिला यांनी सहभाग घेतला होता. विविध दलित समाज संघटनेकडून संकेत भोसलेच्या अमानवी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण फलटण शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत फलटणमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या बंदला संपूर्ण पाठिंबा दिला. निवेदन देतेवेळी विविध मान्यवरांनी या घटनेबद्दल निषेध करणारी भाषणे केली.

न पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील न प्रमुख मार्गावरून मोर्चा शासकीय कार्यालये असलेल्या अधिकार गृह इमारतीवर नेण्यात न आला. पोलिसांनी अधिकार गृह इमारतीच्या न प्रवेशद्वारावर मोर्चा अडविल्यानंतर तेथेच ठाण । मांडून मोर्चेकऱ्यांनी प्रमुखांच्या भाषणाद्वारे न आपल्या भावना व्यक्त केल्या.

निवासी नायब तहसीलदार डॉ. डी. एस. व बोबडे-सावंत यांनी अधिकार गृह इमारत प्रवेशद्वारात येऊन मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.

मोर्चात भीमसैनिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. निवेदन दिल्यानंतर बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देत, शहरातील व्यापाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देत दुकाने उघडण्याचे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments