Beed Sarpanch murder : बीडमध्ये सरपंचांची निर्घृण हत्या! आधी कारमधून खाली ओढून मारलं, नंतर अपहरण करून संपवलं

0
19
Beed Sarpanch murder : बीडमध्ये सरपंचांची निर्घृण हत्या! आधी कारमधून खाली ओढून मारलं, नंतर अपहरण करून संपवलं


Beed Sarpanch Kidnapped And Murder In Kej : राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येची घटना ताजी असतांना बीडमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे काही जणांनी अपहरण करत त्यांची हत्या केली आहे. त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या जवळ (ता. केज) आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि ९) दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. संतोष देशमुख असं हत्या झालेल्या सरपंचाचं नाव असून त्यांचं येथील टोलनाक्याजवळून अपहरण झालं होतं.



Source link