Saturday, August 15, 2026
Homeसातारानिरगुडी येथे मायलेकीसह कुटुंबास मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

निरगुडी येथे मायलेकीसह कुटुंबास मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

फलटण : फलटण तालुक्यातील निरगुडी येथील मायलेकीसह त्यांच्या कुटुंबास ‘आमच्याविरोधात पोलिसात तक्रार का दिली’ असे म्हणत शेजारीच राहणाऱ्या एका कुटुंबातील चौघाजणांनी लाथाबुक्क्यांसह, काठीने, पाईपने मारहाण केली. तसेच मायलेकीचा विनयभंग केल्याची तक्रार मारहाण झालेल्या पीडित मुलीने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

गणपत सोपानराव सस्ते, अतुल गणपत सस्ते, संकेत गणपत सस्ते व जयश्री गणपत सस्ते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीने म्हटले आहे की, मी, माझा भाऊ अक्षय, आई हे द्राक्ष पिकावर औषध फवारणीकरिता मळा नावाच्या शेतात गेले होते. तेव्हा आमच्या शेजारी राहणाऱ्या गणपत सोपानराव सस्ते, अतुल गणपत सस्ते, संकेत गणपत सस्ते, जयश्री गणपत सस्ते हे तेथे येऊन ‘तुम्ही आमचेवर एन.सी. का नोंदवली’, असे म्हणून माझा भाऊ अक्षय यास काठीने व फायबरच्या पाईपने मारहाण केली. त्यावेळी मी व माझी आई त्यास सोडविण्यास गेलो असता संकेत सस्ते याने माझा विनयभंग करत मारहाण केली. त्यानंतर माझी आई संगीता हिलाही गणपत सोपानराव सस्ते, अतुल गणपत सस्ते, संकेत गणपत सस्ते यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा विनयभंग करत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर ते चौघेजण आमच्या घरी जाऊन माझ्या वडिलांनाही काठीने व पाईपने मारहाण केली, अशी तक्रार पीडित मुलीने पोलिसात दिली आहया प्रकरणी अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments