Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रखूनाच्या थराराने हादरले सोरटेवाडी; आर्थिक वादातून २७ वर्षीय युवकाचा खून

खूनाच्या थराराने हादरले सोरटेवाडी; आर्थिक वादातून २७ वर्षीय युवकाचा खून

बारामती :- बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे एका तरुणाचा आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धारदार शस्त्राने छातीवर आणि मानेवर वार करून रोहित गाडेकर (वय २७, रा. मासाळवस्ती, सोरटेवाडी) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गाडेकर याचा आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून सोरटेवाडीतील एका माने नावाच्या व्यक्तीसोबत वाद सुरू होता. या वादाला काल रात्री उशिरा कुलकर्णी चारी परिसरात हिंसक वळण लागले. वादात आरोपीने रोहितच्या छातीवर आणि मानेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात रोहितचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास करंजेपूल पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments