Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रगुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

बारामतीत गुंडगिरीवर अजित पवारांचा कठोर इशारा, मोकाची कारवाई करण्याची शक्यता

बारामती – “बारामतीत कसलीही गुंडगिरी वा दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. शहरात अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर प्रसंगी ‘मोक्का’सारख्या कडक कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

बारामती पंचायत समितीत रविवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला, जिथे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केली. “या घटनेचा व्हिडीओ मी स्वतः पाहिला असून, अशा प्रकारची गुंडगिरी कोणत्याही प्रकारे सहन केली जाणार नाही,” असे ते म्हणाले.

पोलिसांना योग्य ती कलमे लावण्याचे आदेश देण्यात आले असून, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांना कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. “कुणीही कायदा हातात घेऊ नये, काही अडचण आलीच तर पोलिसांची मदत घ्या,” असा सल्लाही त्यांनी दिला.

शिफारस करणाऱ्यांवर संताप:
“चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांसाठी काही जण मुंबईला फोन करून ‘त्याला माफ करा दादा’ म्हणतात, पण इतकी बेदम मारहाण करूनही जर शिक्षा झाली नाही, तर त्याची किंमत कळणार कशी?” असे म्हणत त्यांनी अशा शिफारसी करणाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली.

पालकांची जबाबदारी:
“आपली मुले-मुली कुठे जातात, कोणासोबत वावरतात, काय करतात याकडे लक्ष ठेवणं ही पालकांची नैतिक जबाबदारी आहे,” असेही अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments