Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रनऊ वर्षाच्या मुलाचा वडिलांच्या क्रूरतेतून खून - बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना

नऊ वर्षाच्या मुलाचा वडिलांच्या क्रूरतेतून खून – बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना

बारामती :- बारामती तालुक्यातील होळ येथे एका पित्याने आपल्या नऊ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभ्यास करत नसल्याच्या रागातून हा अमानुष प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुलाचे वडील, आई, व एका अन्य व्यक्तीवर खुनाचा व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा तपशील

पीयूष विजय भंडलकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी, विजय गणेश भंडलकर यांनी, १४ जानेवारी रोजी अभ्यास न केल्याबद्दल मुलाला आधी भिंतीवर आपटले व नंतर गळा दाबून त्याचा खून केला. या घटनेत पीयूषची आई शालन भंडलकर व संतोष सोमनाथ भंडलकर यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

अंत्यविधीची तयारी; गुन्हा उघडकीस

घटनेनंतर आरोपींनी पीयूषला नीरा येथील खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉक्टरांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मृत्यूचे गूढ लपवण्याचा प्रयत्न करत आरोपींनी थेट अंत्यविधीची तयारी सुरू केली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत विजय भंडलकर, शालन भंडलकर, व संतोष भंडलकर यांना अटक केली.

पोलिस तपास सुरू

या घटनेमुळे होळ गावात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींवर खुनाचा गुन्हा व पुरावे नष्ट करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments