Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशBadruddin Ajmal : तीनदा खासदार झालेल्या मुंबईच्या प्रसिद्ध अत्तर व्यावसायिकाचा आसाममध्ये १०...

Badruddin Ajmal : तीनदा खासदार झालेल्या मुंबईच्या प्रसिद्ध अत्तर व्यावसायिकाचा आसाममध्ये १० लाख मतांनी पराभव

[ad_1]

मुंबई शहरातील अत्तराचे प्रसिद्ध व्यावसायिक बदरुद्दिन अजमल (Badruddin Ajmal) यांचा आसाममध्ये दारुण पराभव झाला आहे. मुंबईत राहणारे अजमल यांचा अत्तरांचे उत्पादन करून विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. मुंबईत मुख्यालय असलेला ‘अजमल परफ्युम’ हा ब्रॅंड देश-विदेशात प्रसिद्ध आहे. अजमल यांचे मूळ गाव आसामच्या धुबरी जिल्ह्यात असून तेथे त्यांनी अनेक शिक्षण संस्थाही उभारल्या आहेत. आसाममध्ये सीमा भागात राहणाऱ्या निर्वासितांचा मोठा प्रश्न असून या प्रश्नांवर अजमल यांनी अनेक आंदोलने केली आहेत. आसाममध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रश्नावर लढा देत असताना त्यांनी २००५ साली ‘ऑल इंडिया युनायडेट डेमोक्रेटिक फ्रंट’ (All India United Democratic Front) नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. अजमल हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. अजमल हे आसाममधील धुबरी लोकसभा मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजमल यांच्या पक्षाचे तीन खासदार निवडून आले होते. यात स्वतः अजमल (धुबरी लोकसभा), त्यांचा मुलगा सदरुद्दिन अजमल (बारपेट लोकसभा) आणि राधेश्याम बिस्वास (करिमगंज लोकसभा) हे खासदार निवडून आले होते. मात्र यंदा २०२४च्या निवडणुकीत अजमल यांच्या ‘ऑल इंडिया युनायडेट डेमोक्रेटिक फ्रंट’ पक्षाचे उमेदवार तीनही जागांवर पराभूत झाले आहे. धुबरी मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार रकिबुल हुसेन यांनी बदरुद्दिन अजमल यांचा तब्बल १० लाख १२,४७६ अशा विक्रमी मतांनी पराभव केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments