
बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याला वाचवताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.