Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशAyodhya Ram Mandir Inauguration | प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरीतून...

Ayodhya Ram Mandir Inauguration | प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरीतून ‘यांना’ निमंत्रण; सादर करणार विशेष कला | Navarashtra (नवराष्ट्र)

Ayodhya Ram Mandir Inauguration  | प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरीतून ‘यांना’ निमंत्रण; सादर करणार विशेष कला | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरीतून ‘यांना’ निमंत्रण; सादर करणार विशेष कला

राम मंदिर उद्घाटनावेळी परिसरामध्ये लाईव्ह पेंटिंग साकारले जाणार आहे. यासाठी देशभरातून 20 कलाकारांची निवड करण्यात आली. यामध्ये पुण्यातील चित्रकार दिलीप माळी यांचा देखील सहभाग असणार आहे.

पुणे : पिंपरी चिंचवड येथील शाळेमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अयोध्येमध्ये (Ayodhya) लाईव्ह पेंटिंग (Live painting) काढण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. राम मंदिर उद्घाटनावेळी (Ram Mandir Inauguration) स्वामी रामभद्राचार्य यांच्या संस्थेकडून अमृत महोत्सव उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमामध्ये राम मंदिर परिसरामध्ये लाईव्ह पेंटिंग साकारले जाणार आहे. यासाठी देशभरातून 20 कलाकारांची निवड करण्यात आली. यामध्ये पुण्यातील चित्रकार दिलीप माळी (Painter Dilip Mali) यांचा देखील सहभाग असणार आहे.

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. यामध्ये स्वामी रामभद्राचार्य यांच्या रामानंद मिशन विश्वस्त संस्थेने ‘अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे. या उपक्रमामध्ये उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी देशातील तब्बल 20 चित्रकार मंदिर परिसरामध्ये लाईव्ह पेंटिंग काढणार आहेत. यासाठी देशभरातील अनेक चित्रकारांची पारख करण्यात आली. यामध्ये पुण्याच्या दिलीप माळी यांची निवड झाली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments