Ayodhya Ram Mandir | दुसऱ्या दिवशी रामललाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, प्रशासनाने भाविकांना केलं हे आवाहन! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Ayodhya Ram Mandir | दुसऱ्या दिवशी रामललाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, प्रशासनाने भाविकांना केलं हे आवाहन! | Navarashtra (नवराष्ट्र)


Ram mandir menu (6)

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवशीही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. वृद्ध आणि अपंगांनी दोन आठवड्यांनंतर राम मंदिरात जाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी (22 जानेवारी) रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या (PM Narendra Modi) उपस्थितीत राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा (Ram Mandir Inauguration) पार पडला. आज मंदिर उदघाटनाचा दुसऱ्या दिवशी पासूनच अयोध्येत भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. रात्री उशीरापासूनच हजारो लोक मंदरिराबाहेर जमू लागले आहेत. राम मंदिराबाहेर रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने वृद्ध आणि दिव्यांगांनी दोन आठवड्यांनंतरच राम मंदिरात जाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा

भाविकांची प्रचंड गर्दी

रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक मंदिराच्या दिशेनं येताना दिसत आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होताना दिसत आहे.  राम मंदिराच्या आत आणि बाहेर सतत गर्दी असते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सर्वांना सहज दर्शन घेता यावे, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. अभिषेक झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी प्रचंड गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. यानंतर इतर जिल्ह्यातून अयोध्येला जाणाऱ्या बसेसची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. मंगळवारी सुमारे पाच लाख लोकांनी रामललाचे दर्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे.






Source link