गुवाहाटी येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग रावत यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. सिंगतामजवळील बुरडांग येथील घटनास्थळी लष्कराची वाहने खणली जात आहेत.
सिक्कीमध्ये सध्या पावसाचं भयंकर रुप पहायला मिळत आहे. सिक्कीम ढगफुटी झाल्यानंतर लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला मंगळवारी रात्री पूर आला आणि क्षणात होत्याच नव्हत झालं. या पुरात (Flood in assam) सात जवानांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, भारतीय लष्कराचे २३ जवानही बेपत्ता (indian army soldiers) झाले आहेत. सध्या 15 जवानांचा शोध सुरू आहे. भारतीय लष्कर उत्तर सिक्कीममध्ये अडकलेल्या नागरिकांना आणि पर्यटकांना अन्न, वैद्यकीय मदत आणि दळणवळण सुविधा पुरवत आहे. पुरानंतर रस्ते व इतर ठिकाणी गाळ साचला आहे. त्यांची साफसफाई करण्याचं कामही सुरू आहे.
हे सुद्धा वाचा
बेपत्ता जवानांचा शोध सुरू
गुवाहाटी येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग रावत यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. शोधाचा फोकस तीस्ता बॅरेजच्या डाउनस्ट्रीम भागांवर आहे. सिंगतामजवळील बुरडांग येथील घटनास्थळी लष्कराची वाहने खणली जात आहेत. शोध मोहिमेत मदत करण्यासाठी टीएमआर (ट्रायकलर माउंटन रेस्क्यू), ट्रॅकर डॉग, विशेष रडारसह अतिरिक्त संसाधने आणण्यात आली आहेत.