
मृत महिलांचा भाऊ सोनू यानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारस रुपवासच्या ब्रह्मा कुमारी आश्रमातील एका भगिनीनं त्याच्या व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट पाठवली. एकता आणि शिखा यांनी हे पाठवल्याचं तिनं सांगितलं. त्यामुळं त्यांचं कुटुंब मुळापासून हादरून गेलं.







