Saturday, September 26, 2026
Homeसातारासी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याने शहरात अवैध धंद्यांना ऊत आला...

सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याने शहरात अवैध धंद्यांना ऊत आला होता

फलटण : फलटण शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दखल घेऊन बातमीपत्रांच्या प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे येत्या सात दिवसात संबंधित ठेकेदाराला सांगून हे कॅमेरे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.शहरातील सदर नऊपैकी आठ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करून ते कार्यान्वित केले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तांत्रिक बिघाड झालेल्या कॅमेराची दुरुस्ती करून तोही कॅमेरा थोड्या दिवसात कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी फलटण नायकच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

श्रीमंत मालोजीराजे पुतळा चौक,महात्मा फुले चौक,गजानन चौक,महावीर स्तंभ चौक,श्रीराम पोलिस चौकी चौक,पाचबत्ती चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,नाना पाटील चौक या आठ चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. संबंधित सीसीटीव्ही कॅमेराची रेकॉर्डिंग फलटण नगरपालिके मध्ये सुरू असल्याची माहिती यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान फलटण शहराच्या सुरक्षतेच्या दृष्टीने पत्रकारांच्या पुढाकाराने लोकसहभागातून लाखो रुपये खर्च करून चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.मात्र फलटण नगरपालिका प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा देखभाल खर्च परवडत नसल्याचे कारण देत कॅमेरे बंद ठेवण्यात आलते त्यामुळे फलटण शहराच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.वर्षाला लाखो रुपयांचा कर वसूल करणाऱ्या फलटण नगरपालिकेला देखभाल खर्च परवडत नसल्याचे कारण देत फलटण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवल्याने गावगुंडांकडून राजरोसपणे दहशत पसरवण्याचे उद्योग खुलेआम करण्यात येत होती,त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने शहरात अवैध धंद्यांना ऊत आला होता.फलटणमध्ये दुचाकी चोरी,चोरी मारामारी, साखळी चोर, मोबाईल चोरी,रोड रोमियोची दादागिरी यांसारख्या गंभीर गुन्हाांमध्ये वाढ झाली होती. गुन्ह्यांमध्ये आरोपीला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची महत्त्वाची भूमिका असते,मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला होता.मागील काही गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले होते.त्यामुळे येथील सीसीटीव्ही असून अडचण नसून खोळंबा,अशी अवस्था झाली होती.पत्रकारांच्या पुढाकाराने सामाजिक संस्था व लोकवर्गणीतून फलटण शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. फलटण नगरपालिकेच्या पुढाकाराने सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू झाल्याने वरील सर्व गोष्टींना आळा बसण्यास मदत होईल असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments