Tuesday, September 22, 2026
Homeसाताराफलटणच्या आरोही विशाल पाटीलची 14 वर्षाखालील महाराष्ट्र हॉकी संघात निवड

फलटणच्या आरोही विशाल पाटीलची 14 वर्षाखालील महाराष्ट्र हॉकी संघात निवड

फलटण – मुधोजी हायस्कूल फलटणच्या आरोही विशाल पाटील हिची 14 वर्षाखालील महाराष्ट्र हॉकी संघात गोलकीपर म्हणून निवड झाली आहे. इस्लामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. या यशाने फलटण नगरीच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे.

संघातील खेळाडूंना व प्रशिक्षकांना फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम तसेच प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

आरोहीच्या यशामुळे संपूर्ण फलटण तालुक्यात तिचे कौतुक होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यापूर्वी भारतीय हॉकी संघात फलटणच्या अक्षता ढेकळे, वैष्णवी फाळके व ऋतुजा पिसाळ या तीन कन्यांनी नेतृत्व केले आहे. आता आरोही विशाल पाटील महाराष्ट्र संघात गोलकीपर म्हणून चमक दाखवल्यानंतर ती लवकरच देशाच्या हॉकी संघात दिसेल अशी अपेक्षा फलटणकर व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments