Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशArgentina Fire | अर्जेंटिनाच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ पार्कमध्ये लागली आग, 600...

Argentina Fire | अर्जेंटिनाच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ पार्कमध्ये लागली आग, 600 हेक्टर क्षेत्रातील सर्व काही खाक! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अर्जेंटिनाच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ पार्कमध्ये लागली आग, 600 हेक्टर क्षेत्रातील सर्व काही खाक!

अर्जेंटिनातील लॉस एंजेलिस नॅशनल पार्कमधील आग आटोक्याच्या बाहेर गेली आहे. या उद्यानाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले आहे. मात्र आगीमुळे या ऐतिहासिक उद्यानाचे मोठे नुकसान झाले आहे.

अर्जेंटिनामधील युनेस्को घोषित जागतिक वारसा स्थळ उद्यानात भीषण आग लागली (fire breaks out in argentinas unesco world heritage site park ) आहे. या आगीत सुमारे 600 हेक्टर क्षेत्रातील सर्व काही खाक झाले आहे. आग विझवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. आता ही आग जवळपासच्या दोन शहरांमध्ये पोहोचली असून त्यामुळे जीवित आणि मालमत्तेला धोका वाढला आहे. आग आटोक्यात येत नसल्याचे अर्जेंटिनाच्या आपत्कालीन विभागाने सांगितले. सतत वाहणारे वारे आणि तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे आणखी कठीण झाले आहे.

परिसराचे तापमान पोहोचले 40 अंशांवर

अर्जेंटिनामध्ये ज्या उद्यानात आग लागली त्या उद्यानातील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. यासोबतच जोरदार वारेही वाहत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. ही आग एप्रिल महिन्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. चुबुत प्रांतातील बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग जवळच्या एस्क्वेल आणि ट्रॅव्हलिन या शहरांमध्ये पोहोचली आहे. हे ब्युनोस आयर्सच्या नैऋत्येस सुमारे 2000 किलोमीटर अंतरावर आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments