Ankita Lokhande: ‘माझ्यासाठी हार-जीत फार महत्त्वाची नव्हती, पण…’; बिग बॉसनंतर अंकिता लोखंडेची पहिली पोस्ट!

0
16
Ankita Lokhande: ‘माझ्यासाठी हार-जीत फार महत्त्वाची नव्हती, पण…’; बिग बॉसनंतर अंकिता लोखंडेची पहिली पोस्ट!


‘बिग बॉस १७’ हा शो संपल्यानंतर आता अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अंकिता लोखंडे हिने या पोस्टमध्ये लिहिले की, ‘पवित्र रिश्तापासून सुरू झालेला प्रवास आता ‘नाती सांभाळणारी मुलगी’ या ओळखीने आणखी अविस्मरणीय झाला आहे! तुमच्या पाठिंब्याने आणि तुमच्या प्रेमाने मला इथपर्यंत आणले आहे. आणि म्हणूनच मला माझ्या विजय-पराजयाने काही फरक पडत नाही. या प्रवासात नक्कीच चढ-उतार होते… काही पाठीशी उभे राहिले, काही नाही राहिले, पण तुम्ही लोक नेहमीच माझ्यासोबत होतात! मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझ्यावर प्रेम केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.’



Source link