
अमरावतीमधील दर्यापूर-अकोला मार्गावर दोन कारची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.