Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रकोरेगाव-फलटण मार्गाच्या सुधारणा प्रकल्पाला गती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कोरेगाव-फलटण मार्गाच्या सुधारणा प्रकल्पाला गती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई | साहस Times – सातारा जिल्ह्यातील कोरेगाव ते फलटण प्रवास सुलभ करण्यासाठी रेडे घाट मार्गाच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीस कोरेगावचे आमदार महेश शिंदे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, ग्रामविकास (रस्ते) विभागाचे सचिव सतीश चिखलीकर, सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, तसेच साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर, तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई आदी अधिकारी उपस्थित होते.

रेडे घाट मार्गाच्या कामांमध्ये भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून दर्जेदार व मजबूत रस्ते उभारण्यावर भर द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच, या प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments