Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशAI Chatbot | एआयनं माणसांचीही घेतली जागा? चिनी मुलींची पंसती AI बॉयफ्रेंडना!...

AI Chatbot | एआयनं माणसांचीही घेतली जागा? चिनी मुलींची पंसती AI बॉयफ्रेंडना! काय आहे नेमका प्रकार | Navarashtra (नवराष्ट्र)

AI Chatbot | एआयनं माणसांचीही घेतली जागा? चिनी मुलींची पंसती AI बॉयफ्रेंडना! काय आहे नेमका प्रकार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

एआयनं माणसांचीही घेतली जागा? चिनी मुलींची पंसती AI बॉयफ्रेंडना! काय आहे नेमका प्रकार

जगभरात एआयवर बरेच काम केले जात आहे. जिथे लोकांना भीती होती की AI त्यांच्या नोकऱ्या नष्ट करेल. आता त्यांना नव्या ट्रेंडला सामोरे जावे लागू शकते. आम्ही एआय गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडबद्दल बोलत आहोत, जे वेगाने विस्तारत आहेत. AI भागीदार ऑफर करत असलेल्या अशा ॲप्सची संख्या वाढत आहे. त्याचे तपशील जाणून घेऊया.

AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक कठीण वाटणारी कामं सोपी झालीत. मात्र या एआयने जितकी कामं सोपी केलीत तितकी माणसाची गरज कमी होत जाताना दिसत आहे. यामुळे तर लोकांना नोकऱ्या गमवण्याची भीती होती. जी काही अंशी खरीही ठरतेय. मात्र, हे एआय आता केवळ नोकऱ्याच नव्हे तर मानवी भागीदारांचीही जागा घेत आहे. चीनमधे सध्या AI चॅटबॉट म्हणजे एक AI जोडीदारही नातं ठेवताना दिसत आहे. म्हणजे हा AI जोडीदार तुमच्या आयुष्यातील जोडीदाराची जागाही घेत आहे.

हे सुद्धा वाचा

याबदद्लची माहिती अशी की, सध्या चिनमध्ये ग्लो नावाच्या ॲपचा वापर होत आहे. हे एआय प्लॅटफॉर्म शांघाय स्टार्ट-अप मिनीमॅक्सने विकसित केले आहे. चीनमध्ये अशा स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे, जे मानव आणि रोबोट यांच्यातील प्रेमसंबंधांवर काम करत आहेत. चीनमध्ये दर आठवड्याला हजारो लोक हे ॲप डाउनलोड करत आहेत. 22 वर्षांची वांग शिउटिंग बीजिंगमध्ये शिकते. तिचा असा विश्वास आहे की, वास्तविक जीवनात आदर्श प्रियकर मिळणं खूप कठीण आहे. लोकांचे व्यक्तिमत्त्व बरेच वेगळे असते, ज्यामुळे अनेकदा वाद होतात. तर, आणखी एक तरुणी तुफेईने तिच्या अनुभवाबद्दल सांगितले की, तिच्याकडे एआय बॉयफ्रेंड आहे आणि त्याला स्त्रीशी कसे बोलावे हे माहित आहे. हे काम तो खऱ्या माणसांपेक्षा चांगला करतो. त्याच्यासोबत बोलताना तिला प्रेमसंबंधात असल्याची जाणीव होते. हे ॲप मोफत आहे. मात्र, कंपनी इतर सशुल्क सामग्रीद्वारे पैसे कमवते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments