Tuesday, September 15, 2026
Homeसातारालोकसभेनंतर ही खासदार गटात प्रवेशाचा ओघ काम ; फलटणमध्ये राजे गटाला खिंडार...

लोकसभेनंतर ही खासदार गटात प्रवेशाचा ओघ काम ; फलटणमध्ये राजे गटाला खिंडार !

फलटण : माणिकराव सोनवलकर हे फलटण तालुक्याच्या राजकारणामधील मोठे नाव आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून माणिकराव सोनवलकर हे राजे गटासोबत राहिले होते. त्यांनी दुधेबावी ग्रामपंचायतीपासून अगदी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. त्यानंतर सोनवलकर व त्यांची पत्नी सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये सेवेमध्ये आहेत

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी राजे गटाला राम राम ठोकत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच सोनवलकर यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

माणिकराव सोनवलकर यांच्या प्रवेशा वेळी शिवरूपराजेंची उपस्थिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी राजे गटाला राम राम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची सुद्धा उपस्थिती सदरील कार्यक्रमाला असल्याने फलटण तालुक्यातील अनेकांच्या भुवया यावेळी उंचावल्या होत्या.

राजे गटातून खासदार गटात येण्याचा ओघ कायम विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे गटामधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असणाऱ्या खासदार गटामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा कायम राहिलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय सोडमिसे, माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे, संतकृपा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विलासराव नलवडे, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अजय माळवे युवा नेते सुधीर अहिवळे यांच्यासह फल तालुक्यातील विविध गावच्या सरपंचांनी राजे गटाला राम राम ठोकत खासदार गटात प्रवेश केला

तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध : माजी खासदार रणजितसिंह लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून आपल्याला तब्बल 18 हजार मतांचे मताधिक्य मिळालेले होते. यातूनच फलटण तालुका हा आता भारतीय जनता पार्टी सोबत खंबीरपणे उभा राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. फलटण शहरासह तालुक्याचा गेल्या 30 वर्षांपासून विकास रखडलेला होता. तो मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments