Aai Kuthe Kay Karte 7th nov: मला माझ्यावर विश्वास नाही; मुल दत्तक घेण्यावर अरुंधती स्पष्टच बोलली

0
15
Aai Kuthe Kay Karte 7th nov: मला माझ्यावर विश्वास नाही; मुल दत्तक घेण्यावर अरुंधती स्पष्टच बोलली


हे सगळं ऐकून आशुतोष म्हणतो की, ‘बापरे जरा थांब. काय वेग आहे या विचारांचा. अगं आपण त्या मुलीला भेटलो पण नाही. मग कशाला एवढा पुढचा विचार. तू काही निर्णय घेतलाय का?’ त्यावर अरुंधती म्हणते की, ‘नाही माहिती आशुतोष. आजकालची मुले बदलली आहेत. आजूबाजूचे वातावरण बदलले आहे. मी बदलले. मी माझ्या मुलांना जसे वाढवले तसे आता वागून नाही चालणार. म्हणजे अभी-अनघा जानकीशी जसे वागतात तसे मला वागायला जमेल का? मला माहिती नाही. आपण एक पीढी मागे आहोत. मी आजी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडू शकते. पण आई म्हणून मला जमेल की नाही या वयात माहिती नाही. मला माझ्याबद्दल खात्री नाही. पुन्हा सगळं पहिल्यापासून मला जमेल की नाही माहिती नाही.’



Source link