Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War | इस्रायल हमास युद्धामुळे इस्रायलमध्ये बांधकामं रखडली, भारतातून एक...

Israel Hamas War | इस्रायल हमास युद्धामुळे इस्रायलमध्ये बांधकामं रखडली, भारतातून एक लाख कामगार पाठवण्याची मागणी! | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas War | इस्रायल हमास युद्धामुळे इस्रायलमध्ये बांधकामं रखडली, भारतातून एक लाख कामगार पाठवण्याची मागणी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायल हमास युद्धामुळे इस्रायलमध्ये बांधकामं रखडली, भारतातून एक लाख कामगार पाठवण्याची मागणी!

इस्रायलमध्ये अनेक पॅलेस्टिनी कामगार काम करतात, मात्र हमासच्या हल्ल्यानंतर कंपन्यांनी या कामगारांना काढून टाकले. त्यामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये बांधकामे ठप्प झाली आहेत. काही चिनी कामगार तिथे काम करत असले तरी त्यांची संख्या खूपच कमी आहे.

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला (Israel Hamas War) आज एक महिना पुर्ण झाला आहे आहे. अजुनही इस्रायलने हमासवर हल्ले करणं थांबवलेलं नाही. या युद्धाची झळ संपुर्ण इस्रायलला बसली असून बांधकाम क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झाला आहे. परिणामी काम रखडल्यामुळे इस्रायलने भारताला तातडीने एक लाख बांधकाम कामगार पाठवण्याची विनंती केली आहे. अमेरिकन मीडियानुसार, इस्रायली बांधकाम कंपन्यांनी त्यांच्या सरकारकडे एक लाख भारतीय कामगारांची भरती करण्याची परवानगी मागितली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय कारण?

इस्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रात अनेक पॅलेस्टिनी कामगार काम करताता, मात्र हमासच्या हल्ल्यानंतर कंपन्यांनी या कामगारांना काढून टाकले आहे. त्यामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये बांधकामे ठप्प झाली आहेत. काही चिनी कामगार तिथे काम करत असले तरी त्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे इस्रायलमधील बांधकाम कंपन्यांनी त्यांच्या सरकारकडे एक लाख भारतीय कामगारांची भरती करण्याची परवानगी मागितली आहे. त्यांना पॅलेस्टिनी कामगारांच्या जागी ठेवण्यात येईल.अशा परिस्थितीत, इस्त्रायली सरकार आणि कंपन्या त्याच गतीने बांधकाम उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी भारताकडे उत्सुक आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments