
आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध नितीनवर अनेक आरोप करतो आणि त्याला घरातून बाहेर काढणार असल्याचे सांगतो. तेवढ्यात अरुंधतीमध्ये येते आणि अनिरुद्धच्या कानाखाली वाजवते. अनिरुद्ध देखील तिच्यावर हात उगारतो. मात्र अरुंधती त्याला लगेच थांबवते आणि म्हणते, काही नात्यांचे पावित्र जपता आले नाही तर दुसऱ्यांच्या नात्यामध्ये विश कालवायला आले आहात का? अरुंधतीने उचललेल्या पावलाचे सर्वजण कौतुक करत आहेत.










