
गौरी यशशी असणारं नातं मोडून परदेशी निघून गेली होती. आधीच यश आणि गौरी एकमेकांपासून मनाने खूप दुरावले होते. गौरीचं कामानिमित्त परदेशी जाणं आणि अचानक यशशी सगळे संबंध तोडणं, यामुळे आधीच त्यांच्या नात्यात अनेक वितुष्ट आले. मात्र, यानंतर गौरी यशसोबतचा साखरपुडा मोडूनच परदेशी गेली होती. तिच्या अशा वागण्यामुळे यश मात्र पुरता खचून गेला होता. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःला गाण्यांच्या कामामध्ये झोकून दिलं आहे. तो सावरत असतानाच जर आता पुन्हा गौरीची एन्ट्री झाली, तर यशसाठी हा मोठा धक्का असणार आहे.








