Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्र  संघाच्या एक दिवसीय कोंडीविटे अभ्यास दौरा ; सूरज जगताप

  संघाच्या एक दिवसीय कोंडीविटे अभ्यास दौरा ; सूरज जगताप

रविवार दिनांक : २५/२/२०२४ रोजी सम्यक सांस्कृतिक संघाने एक दिवसीय कोंडीविटे अभ्यास दौरा आयोजित केलेल्या होता. हा दौरा लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आहे. कोंडीविटे लेणी एक दिवसीय अभास दौऱ्यावर माननीय देवेन्द्र सोनटक्के सर जे क्षेत्रीय पी एफ आयुक्त वाशी, नवी मुंबई हे उपस्थिती होते.

बौद्ध धम्मात लेण्यांचे विशेष असे स्थान आहे. लेण्यांमधून बौद्ध धम्मासोबतच, बौद्ध साहित्य, बौद्ध संस्कृती, स्थापत्यकला आदींची माहिती मिळते. लेण्यांच्या अभ्यासातून बौद्ध धम्माविषयीची महत्वपूर्ण माहिती, खुलासे अभ्यासकांनी समोर आणले आहेत.

अनेक लेणी संवर्धक लेण्यांसदर्भात जनजागृती करण्यासाठी लेणी अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करत असतात. असाच एक लेणी दौरा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी या लेणी अभ्यास दौऱ्यात अभ्यासक सूरज रतन जगताप यांनी ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गरम पाण्याचे कुंड म्हणजेच वज्रेश्वरी याचा कोंडिविटे लेणी शी काय संबंध आहे, याच बरोबर कोंडिविटे लेणीची सखोल माहिती देताना. कातळ शिल्प हे बोलतात ; ती तुम्हाला बोलकी करता आली पाहिजेत, अभ्यास चिकाटी आणि निरीक्षणाची जोड दिली की मूक असलेले शिल्प देखील आपल्याशी संवाद साधतात .

मुंबईत व सभोवताली एकूण २५० बौद्ध लेणी आहेत, त्यातील काही सरकारच्या उदासीनतेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, इत्यादी माहिती देण्यात आली. त्याचसोबत धम्म बांधवांना या लेणी अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून बौद्ध वारसा आपण कसा जतन केला पाहिजे व पुरातत्व विभागाकडे कसा पाठपुरावा केला पाहीजे याबाबत सुद्धा मार्गदर्शन केल पाहिजे .

मुंबई मधल्या इतक्या सुंदर लेणी च दर्शन आज पर्यंत झालं नव्हतं. पण आज सूरज सरांच्या मार्ग दर्शनाद्वारे या ऐतिहासिक लेणीची खडान खडा माहिती मिळाली. आज जिथे आपण अभ्यास वजा पर्यटन करत होतो तिथे कधी काळी अर्हत पद प्राप्त केलेले बौद्ध भिख्खू ध्यान धारणा करत होते ही किती गर्वाची आणि कृतज्ञतेची गोष्ट आहे. आज आनापानसती ध्यान करताना बहुदा आपल्याला ते जाणवलं असेलच. फक्त छिन्नी आणि हातोडीच्या द्वारे घडवलेल हे शिल्प म्हणजे जणू अफाट विश्वाची निर्मिती करून थकलेल्या निर्मिकाने आराम करताना सुचलेल्या कविता आहेत. आपले पूर्वज स्थापत्य शास्त्रात किती प्रगत होते याचं एक उत्तम उदाहरण. जगातली उंच भिंत बांधणारे चिनी, रुक्ष वाळवंटात पिरॅमिड उभारणारा इजिप्त, पॅरिस चे आयफेल टॉवर यांच्या कलाकृती जगातली आश्चर्य मानली जातात. पण डोंगर फोडून कातळ कोरून इतक्या सुंदर लेण्या या आश्चर्यात गिनती केल्या जात नाहीत हेच मोठं आश्चर्य आहे. लेण्यांचा हा इतिहास उलगडण्याचे महत्कार्य करणारे आणि ते जन सामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या सूरज सरांचे फार फार आभार

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments