Friday, August 14, 2026
Homeसातारामहानुभाव पंथीयांची दक्षिण काशी श्रीक्षेत्र फलटण येथे आषाढीनिमित्त प्रसाद वंदनासाठी प्रचंड गर्दी

महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी श्रीक्षेत्र फलटण येथे आषाढीनिमित्त प्रसाद वंदनासाठी प्रचंड गर्दी

फलटण :: महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी श्रीक्षेत्र फलटण येथे आषाढीनिमित्त प्रसाद वंदनासाठी प्रचंड गर्दी,,,,….. महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी असणाऱ्या फलटण या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त सर्व मंदिरांमध्ये व सर्व आश्रमांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त प्रसाद वंदन करण्यासाठी संपूर्ण भारत वर्षातून जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, हिमाचल, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, विशेष करून विदर्भ, मराठवाडा सर्वच महाराष्ट्रातून प्रचंड भाविक फलटण तीर्थक्षेत्री प्रसाद वंदन व देवपूजा करण्यासाठी आषाढी निमित्त काल रात्रीपासूनच दाखल झाले होते,, या सर्व भाविकांची राहण्याची व्यवस्था श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट च्या चार मंदिरांमध्ये व सर्व आश्रमांमध्ये करण्यात आली होती,, याप्रसंगी आषाढीनिमित्त सकाळपासूनच सर्व मंदिर व आश्रमांमध्ये देवपूजा व प्रसाद वंदन करण्यासाठी अलोट गर्दी झाली होती,, या सर्व भाविकांना देवस्थान श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने सालाबाद वर्षाप्रमाणे याही वर्षी सकाळी

सकाळी नाष्टा व दुपारी 11 ते 3 पर्यंत सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले,, याप्रसंगी एक प्रकारे घोड्याच्या यात्रेगतच फलटणमध्ये यात्रेचे स्वरूप येते,, याप्रसंगी सर्व श्रीक्षेत्र फलटण येथील श्रीमंत आबासाहेब मंदिर,, चक्रपाणी मंदिर,, श्रीकृष्ण मंदिर, रंगशिळा मंदिर,, या ठिकाणी प्रचंड गर्दी भाविकांनी केली होती,, या सर्व ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती, सर्व भाविक भक्तांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट गेली चार दिवस परिश्रम घेत होते,, यामध्ये विशेष करून श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, परमपूज्य आचार्य शामसुंदर विधवांस बाबाजी,, विश्वस्त, श्री बाळासाहेब ननावरे, विश्वस्त श्री अर्जुनराव नाळे,, तसेच व्यवस्थापन प्रमुख श्री मुरलीधर बाबा व सर्व स्टाफ व असंख्य संत महंत व स्थानिक भाविक भक्त उपस्थित होते सर्वांचे आभार ट्रस्टचे विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे यांनी मानले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments