घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती” – ता. का. सूर्यवंशी

0
14
घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती” – ता. का. सूर्यवंशी

“घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती” – ता. का. सूर्यवंशी ;सेवापूर्ती निमित्त श्री. विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा घरी जाऊन सत्कार

फलटण : महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष तसेच सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आयु. ता. का. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. विठ्ठल बाबुराव निकाळजे यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी राष्ट्रभाषानुरागी शिक्षक पतसंस्था, सातारा चे चेअरमन श्री. विजयकुमार पिसाळ, श्री. विकास लादे (अध्यक्ष, कोरेगाव तालुका हिंदी अध्यापक मंडळ), श्री. श्रीकांत लावंड (सचिव, राष्ट्रभाषा भवन समिती, सातारा), श्री. संजय काटवटे (माजी संचालक, राष्ट्रभाषानुरागी शिक्षक पतसंस्था), श्री. नवनाथ शिंदे (व्यवस्थापक), श्री. अंकूश वाठारकर (माजी संचालक), श्री. अनिलकुमार कदम (अध्यक्ष, कार्यवहन त्रैमासिक पत्रिका व कार्याध्यक्ष, खटाव तालुका हिंदी अध्यापक मंडळ), श्री. अरविंद थोरात (अध्यक्ष, फलटण तालुका हिंदी अध्यापक मंडळ), श्री. कुमार सोनवलकर, श्री. मोहन भिसे, श्री. दत्तात्रय नाळे व श्री. देवीदास कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ता. का. सूर्यवंशी यांनी श्री. निकाळजे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “सेवाकाळात त्यांनी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर चालत त्यांनी ज्या शाळांमध्ये काम केले, त्या ठिकाणी आदर्श विद्यार्थी घडवले. आज ते विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत.”
तसेच हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्यातही निकाळजे सरांचा सहभाग अत्यंत क्रियाशील राहिला असल्याचे त्यांनी नमूद केले. “त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा घरी जाऊन सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे. लवकरच जिल्हास्तरावरही त्यांचा गौरव करण्यात येईल,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सूर्यवंशी यांनी “घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती; तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती” या काव्यपंक्तींचा उल्लेख करत निकाळजे कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा व संस्कार यांचे कौतुक केले. पुढील आयुष्य त्यांनी कुटुंबासोबत आनंदात व्यतीत करावे, अशी शुभेच्छा सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी निकाळजे सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी श्री विठ्ठल बाबुराव निकाळजे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने श्री. ता. का सूर्यवंशी सरांचा ही सत्कार करण्यात आला.