
Extramarital Affair Murder Case : लग्न हे विश्वास आणि प्रेमावर उभं असतं. पती पत्नीमधील दोघांपैकी कोणीही या विश्वासाला तोडून विवाहबाह्य संबंध ठेवल्यास संसारात वादळ येतं. अशीच एक विवाहबाह्य संबंधाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत विचित्र प्रकरण समोर आलं आहे. नवऱ्याचं बहिणीसोबत प्रेम प्रकरण होतं, एवढंच नाही तर पत्नीचंही बाहेर अफेयर होतं. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात.
बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील मोरकाही पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव दीनदयाळ असून तो बेगुसरायचा रहिवासी होता. ज्याचा मृतदेह बछौता-अलौलिया रस्त्यावर एका वाहनात आढळला. ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस करत असताना मेहुणीच्या कबुलीमुळे हत्येला एक वेगळंच वळण लागलंय.
खगरियातील मोरकाही पोलीस स्टेशन परिसरात घडलेली एक घटना सध्या खूप चर्चेत आली आहे. भाऊजी आणि मेहुणे यांचं प्रेमप्रकरण होतं. तर भाऊजीच्या पत्नीचं बाहेर दुसऱ्यासोबत अफेयर होतं. या त्रिकोण प्रेमप्रकरणातून दीन दयाल म्हणजे भाऊजीची हत्येमुळे हे प्रकरण समोर आलं आहे. दीनदयाळच्या मृत्यूबाबत आतापर्यंत पोलीस आत्महत्या आणि खून यात गोंधळलेले आहेत. दीनदयाल हे बेगुसराय जिल्ह्यातील बडी संखचे रहिवासी होते. तीन दिवसांपूर्वी, त्याचा मृतदेह बछोटा-अलौलिया रस्त्यावर एका वाहनात पोलिसांना आढळला.
या संदर्भात, मृताचा भाऊ संजीव कुमार यांनी केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे, दीन दयाल यांच्या पत्नी साजो देवी, सासू अनिता देवी, सासरे टुनटुन साह, दीन दयाल यांच्या पत्नीचा प्रियकर असल्याचे सांगितले जाणारे रमन कुमार राणा यांच्यासह अर्धा डझन लोकांवर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचं म्हणणं आहे की, ज्या मेहुणीशी दीनदयाळचे प्रेमसंबंध होते असे म्हटलं जातं, ती या प्रकरणात साक्षीदार बनली आहे.
मृत दीनदयाळच्या मेहुणीने इंटरनेट व्हिडीओवर कबूल केले आहे की ती दीनदयाळशी प्रेम संबंध होते. ती म्हणते की तिची बहीण साजो देवी (दिनदयाळची पत्नी) दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असे. यावरून दोघांमध्ये वाद झाला. तिने आरोप केला की तिच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने मिळून कट रचून त्याच्या भाऊजी दीनदयाळची हत्या केली.
14 एप्रिल रोजी दुपारी 12.17 वाजता मोरकाही पोलिसांना फोनवरून माहिती मिळाली की, एका तरुणाचा मृतदेह खड्ड्यात पडला आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी राजू कुमार म्हणतात की, जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा मृतदेह खड्ड्यात नव्हे तर वाहनात आढळला. हे वाहन मृताच्या बेगुसराय इथल्या मामाचे असल्याचे सांगण्यात आलंय.