Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रशोध हरवलेल्या स्वप्नांचा… दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील भयावह कहाणी!

शोध हरवलेल्या स्वप्नांचा… दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील भयावह कहाणी!

बारामती : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने पाठलाग, छेडछाड आणि सततच्या धमक्यांमुळे कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना संपूर्ण गावाला हादरवणारी ठरली असून, चार जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी विशाल दत्तात्रय गावडे, प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे आणि सुनील हनुमंत खोमणे अशी आरोपींची नावे असून, हे चौघे मिळून गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलीचा पाठलाग करत होते. तिला वेळोवेळी अश्लील प्रस्ताव देणे, धमकी देणे आणि शस्त्र दाखवून तिच्यावर दबाव आणण्याचे प्रकार सातत्याने सुरू होते.

७ एप्रिल रोजी गावातील यात्रेपूर्वी आरोपींनी पीडितेला धमकावत सांगितले, “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या आईवडिलांचं मुंडकं उडवीन!” या धमकीमुळे मानसिकदृष्ट्या तणावात आलेल्या मुलीने आईवडिलांच्या सुरक्षिततेच्या भीतीपोटी टोकाचं पाऊल उचललं.

या घटनेनंतर पोलीसांनी संबंधित आरोपींविरोधात भादंवि कलम १०७, ७८, २९६, ३५२, ३५१, तसेच पोक्सो कायदा आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments