Thursday, September 24, 2026
Homeसाताराभीम फेस्टिव्हल 2025: फलटणमध्ये ‘जल्लोष भीम गीतांचा’ भव्य कार्यक्रम!

भीम फेस्टिव्हल 2025: फलटणमध्ये ‘जल्लोष भीम गीतांचा’ भव्य कार्यक्रम!

फलटण – महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त भीम फेस्टिव्हल 2025 अंतर्गत ‘जल्लोष भीम गीतांचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजक युवा उद्योजक  संग्राम अहिवळे आणि सोनू संग्राम अहिवळे यांनी ही माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सांस्कृतिक सोहळा साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर असतील. तसेच, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) सुनिल आनंदराव जाधव, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस् फलटणचे चेअरमन श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर आणि समाजकल्याण निरीक्षक दत्ता म्हस्के यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध दिग्दर्शक गणेश दुबळे यांच्या ‘चवदार तळाचा सत्याग्रह’ या ऐतिहासिक नाटिकेचा प्रयोग सादर होणार आहे. तसेच, उच्चशिक्षित गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव’ समारंभ, ‘दर्पण पुरस्कार’ प्राप्त पत्रकारांचा सन्मान आणि सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध भीम गीत गायिका कडुबाई खरात यांचा विशेष सादरीकरण असणार आहे. त्यांच्या जोडीला आंबेडकरी प्रभावशाली रील स्टार तृप्ती बोरकर, ‘फॅन झालो ग स्वाभिमानाने जय भीम’ फेम ऋतिक गंगावणे, तसेच भीम गायिका प्रज्ञा कांबळे यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.

सनी अहिवळे (माजी नगरसेवक) आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश काकडे (आप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच, रोहित माने, गणेश बिराडे, सिद्धार्थ अहिवळे, विकी काकडे, आदित्य साबळे, विशाल गुंजाळ, मुकुल अहिवळे, रवी मोरे, तेजस भोसले हे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्नशील आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments