Saturday, August 22, 2026
Homeसातारासमशेरसिंह नाईक निंबाळकर : कर्तृत्वाने झळाळणारे नेतृत्व!

समशेरसिंह नाईक निंबाळकर : कर्तृत्वाने झळाळणारे नेतृत्व!

फलटणच्या विकासासाठी हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे स्वप्न साकारत ‘ रणजितसिंह व समशेरसिंह बंधू’ पुढे सरसावले!

फलटण :- माजी खासदार कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी अपार मेहनतीने, कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा करारी स्वभाव, रोखठोक निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेले नाते यामुळे ते लोकनेते बनले. आज त्यांचे सुपुत्र, खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर हे दोघे मिळून त्यांचे फलटणच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

समशेरसिंह नाईक निंबाळकर हे राजकीय वाटचालीत वेगळी ओळख निर्माण करणारे, मनाने मोठे आणि कार्यकर्त्यांना आपलेसे करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सत्ता, प्रसिद्धी, मोठेपणाच्या शर्यतीपासून दूर राहून, ते नेहमीच ‘जनता हेच माझे दैवत’ या विचाराने कार्यरत असतात. फलटण नगरपरिषदेत विरोधी पक्ष नेतेपद सांभाळताना त्यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जनसंपर्क आणि राजकीय दूरदृष्टी असलेले नेतृत्व

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना लहानपणापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील बाळकडू मिळाले. त्यांच्या परखड निर्णयक्षमतेमुळे त्यांनी राजकीय ताकदीचा स्वतंत्र गट उभारला. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडत त्यांनी प्रभावी नेतृत्व दाखवले.

फलटणच्या विकासासाठी ठोस नियोजन असलेल्या या नेत्याने शहराच्या प्रश्नांवर धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यांच्याकडे केवळ राजकीय डावपेच आखण्याची क्षमता नाही, तर फलटण शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी एक ठोस ‘ब्लू प्रिंट’ आहे. त्यामुळेच, आज फलटणकरांना विश्वास वाटतो की, माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे अपूर्ण स्वप्न त्यांचे सुपुत्र रणजिसिंह नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर पूर्ण करतील.

फलटणच्या राजकारणात नाईक निंबाळकर बंधूंची ताकद वाढतेय!

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढता जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे फलटणच्या राजकारणात त्यांचे वजन वाढले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले जात आहेत. येणाऱ्या काळात या दोन्ही नाईक निंबाळकर बंधूंनी मिळून फलटणच्या विकासाला गती द्यावी आणि समाजसेवेच्या माध्यमातून मोठी राजकीय ताकद निर्माण करावी,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments