Friday, August 14, 2026
Homeसातारामोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना हायकोर्टाचा झटका, जामीनास नकार!

मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना हायकोर्टाचा झटका, जामीनास नकार!

मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना हायकोर्टाचा झटका, जामीनास नकार!

[ad_1]

Satara Court Judge Bribe Case सातारा : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाच घेताना रंगेहात पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने झटका  दिला आहे.  लाचखोरीचा आरोप असलेल्या न्यायाधीशांना अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे सातारा सत्र न्यायालयातील न्यायाधीशांना दिलासा न मिळाल्याचे समोर आले आहे. 

एका प्रकरणात आरोपीला जामीन देण्याकरता 5 लाखांची लाच घेतल्याचा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, सातारा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला न्यायाधीश महोदयांनी हायकोर्टात दिलेलं आव्हान याचिका आता फेटाळण्यात आली आहे. न्यायाधीशांनी त्यांचे निकटवर्तीय खरात बंधूंमार्फत लाच मागितल्याची एसीबीकडे  तक्रार आली होती. न्यायाधीश निकम यांनी सारे आरोप फेटाळले असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निकमांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टानं ग्राह्य धरले आहे. परिणामी या प्रकरणात  न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

एका खटल्यातील संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र संशयीत आरोपी ते देण्यास असमर्थ असल्याने  त्याने हा सर्व प्रकार लाच लुचपत विभागाला देत रितसर तक्रार दिली. या तक्रारीवरुन पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे कारवाई केली आणि छापा टाकाला. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीशांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडल्यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेल्याची चर्चा रंगू लागली होती. अशातच हे प्रकरण न्यायालयात गेलं असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निकमांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टानं ग्राह्य धरले आहे. परिणामी या प्रकरणात  न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे.

तर दुसरीकडे,  न्यायाधीशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे ही समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे. किशोर खरात हे मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत आहेत. तर न्यायाधीश धनंजय निकम यांची पाच लाखांची लाच घेण्याच्या प्रक्रियेत किशोर खरात यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. तर धनंजय निकमसह चौघांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने या आधीच फेटाळला होता.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments