Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रवेरूळ लेणीतील किरणोत्सव: सूर्याच्या सोनेरी प्रकाशात उजळले सम्यक संबुद्ध

वेरूळ लेणीतील किरणोत्सव: सूर्याच्या सोनेरी प्रकाशात उजळले सम्यक संबुद्ध

फलटण :- दिनांक १० मार्च २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध वेरुळ लेणीवर किरणोतस्वाच्या निमित्ताने उपस्थित होतो, राज्यातून देशातून तसेच जगभरातून इतिहास प्रेमी व बौद्ध धम्म अनुयायी हा किरणोतस्वाचा सोहळा अनुभवण्यासाठी उपस्थित होते.
दर वर्षी ९, १० व ११ मार्च रोजी उत्तरायणातील संध्या समयीची सोनेरी किरणे लेणी क्रमांक १० मधील जे की वेरुळ लेणी समूहातील एकमेव चैत्यगृह आहे ( प्रार्थनास्थळ ) या चैत्यगृहाच्या “चैत्य वातायनातुन” थेट आत चैत्यगृहात प्रवेश करतात, संध्या समयीची सोनेरी किरणे ठीक ५ वाजता आत प्रवेश करतात व पायापासून ते सम्यक संबुध्द यांच्या मुखावर स्थिरावण्यासाठी आतुरलेली उन्हे कलेकलेने वर वर सरकत जातात, साधारण तासाभरा नंतर सूर्याची सोनेरी किरणे काही काळा करता सम्यक संबुध्दांच्या स्थितप्रज्ञ असलेल्या चेहर्‍यावर येऊन स्थिरावतात, ऐरवी अंधारलेला संपूर्ण चैत्यगृह या सोनेरी किरणांनी उजळून निघतो.

“एका तेजाने दुसर्‍या तेजाची घेतलेली भेट” अंधाराची काळीकुट्ट जळमटे दूर सारण्यासाठी जशी सूर्य किरणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत तसेच समस्त मानवीय मनातील अज्ञानाचा काळाकुट्ट अंधकार दूर करण्यासाठी सम्यक संबुध्द यांचे तत्वज्ञान महत्त्वपूर्ण ठरतात, ही कल्पक भेट घडवून आणली होती तत्कालीन स्थापत्य विशारद गणीतज्ञ आणि खगोलशास्त्र जाणत्यांनी, इ सन च्या सहाव्या शतकातील या वास्तूतील हा प्रयोग तत्कालीन जनमानसाच्या काळाच्या पुढचा होता, तत्कालीन आदरणीय भदंत किती प्रगत होते याची प्रचीती आपल्याला हा किरणोतस्व पाहिल्यानंतर कळुन येतो , यंदा ११ तारखेला साप्ताहिक सुट्टी असल्याने ( दर मंगळवारी सुट्टी असते ) १० मार्च सोमवारी रोजी प्रचंड मोठ्याप्रमाणात लोकांनी उपस्थिती दर्शवली होती साधारण पाच हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.
“एलापूर” ज्याचे इंग्रजांना उच्चारण करता येत नसल्याने त्यांनी या लेणी समूहाला “एलोरा” असे म्हणण्यास सुरुवात केली व कायमचे हे नाव या लेणी समूहाला चिकटून गेले , राष्ट्रकुटांच्या मिळालेल्या ताम्रपटातुन व या भूभागावर राज्य केलेल्या इतर राज घराण्यांच्या नोंदीतुन एलापूर या नामाभिधानाचे संदर्भ सापडतात, त्याच बरोबर संत साहित्यातून देखील तसे संदर्भ सापडतात, उत्कृष्ट कलाकुसर केल्या कारणास्तव “शैल गृहाला” सुतारकी झोपडी वगैरे चुकीचे संदर्भ देऊन जनमानसात पसरवले जात आहे जी की ही एक चुकीची बाब आहे पण भारतात अशा चुकीच्या बाबी आवडीने चघळल्या जातात खासकरून बौद्ध स्थापत्य/ ठिकाणांबद्दल.
प्राचीन भारतीय कला विश्वातील वेरुळ लेणीवरील किरणोतस्वाचा हा प्रयोग हे आद्य असून याची प्रेरणा घेत नंतरच्या काळात असे प्रयोग आपल्याला इतर स्थापत्यांवर पाहायला मिळतात पण प्रेरणास्थान म्हणुन वेरुळ लेणीचे नाव अगत्याने घेणे आवश्यक आहे.

सूरज रतन जगताप, लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments