Tuesday, August 11, 2026
Homeदेश-विदेशनवऱ्यामुलाने दारुच्या नशेत नवरीमुलीऐवजी तिच्या जिवलग मैत्रिणीच्या गळ्यात घातला हार; पुढे काय...

नवऱ्यामुलाने दारुच्या नशेत नवरीमुलीऐवजी तिच्या जिवलग मैत्रिणीच्या गळ्यात घातला हार; पुढे काय झालं पाहा

नवऱ्यामुलाने दारुच्या नशेत नवरीमुलीऐवजी तिच्या जिवलग मैत्रिणीच्या गळ्यात घातला हार; पुढे काय झालं पाहा

[ad_1]

लग्न म्हटलं की आयुष्याचा नव्याने सुरु होणारा प्रवास असतो. या प्रवासात जर आपला जोडीदार योग्य असला तर तो सुखाने होते. पण जर ही निवड चुकली, तर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय नसतो. सुदैवाने काही जणांना लग्नाच्या आधीच जोडीदाराबद्दल ही कल्पना येते किंवा माहिती मिळते. तर काहींना दुर्दैवाने लग्नानंतरच हे गुपित कळतं. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. प्रकरण इथपर्यंत पोहोचलं होतं की, नवरीमुलीने नवऱ्याच्या कानाखाली लगावत लग्न मोडलं. लग्नमंडपात नेमकं काय झालं हे जाणून घ्या. 

उत्तर प्रदेशातील बरेली येथे लग्नमंडपात नवरामुलगा दारुच्या नशेत पोहोचला होता. यावेळी त्याने दारुच्या नशेत नवरीमुलीच्या मैत्रिणीच्या गळ्यात हार घातला. यानंतर संतापलेल्या 21 वर्षीय नवरीमुलगी राधा देवीने मुलाच्या कानाखाली लगावली आणि लग्न मोडून मंडपातून निघून गेली. पण लग्नमंडपात फक्त एवढंच झालं नाही. 

26 वर्षीय नवरामुलगा रवींद्र कुमार वरात घेऊन लग्नमंडपात उशिरा पोहोचला आणि तिथून सगळं काही सुरु झालं.  नवरीमुलीच्या कुटुंबाने एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्यामुलाच्या कुटुंबाने अतिरिक्त हुंड्याची मागणी केली होती. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आपण लग्नाआधीच्या विधींदरम्यान 2.5 लाख रुपये दिले होते. यानंतर लग्नाच्या सकाळी 2 लाख दिले. पण नवऱ्यामुलाच्या कुटुंबाचं यावरही पोट भरत नव्हतं. 

दुसऱ्या एका दाव्यानुसार, रवींद्र कुमारला आपल्या मर्जीतील मुलीशी लग्न करायचं होतं. तो आपल्या लग्नात दारुच्या नशेत पोहोचला आणि मुलीचं कुटुंब, नातेवाईकांशी गैरवर्तन करु लागला. वरमाला घालण्याची वेळ आली तेव्हा तो आपल्या मित्रांसह मद्यपान करत होता असं एफआयआरमध्ये सांगण्यात आलं आहे. 

लग्न लागताना रवींद्र कुमारने चुकून नवरीमुलीच्या शेजारी उभ्या तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात हार घातला. यामुळे नवरीमुलगी इतकी संतापली की तिने त्याच्या कानाखाली लावली आणि लग्न मोडून निघून गेली. 

प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही. यानंतर नवरामुलगा आणि नवरीमुलीच्या कुटुंबीयांमध्ये हाणामारी सुरु झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. नवरामुलगा आणि वरातीला पुन्हा माघारी पाठवण्यात आलं. 

पोलिसांनी नवरामुलगा आणि त्याच्या मित्रांविरोधात नवरीमुलीच्या कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल आणि शांतता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हुंडा मागितल्याप्रकरणी नवऱ्यामुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांनीच नवऱ्यामुलाला दारु पाजली असं सांगितलं जात आहे. दारु विक्री प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments