Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्र"Right To Love" – प्रेमासाठी लढणारा आधारस्तंभ!

“Right To Love” – प्रेमासाठी लढणारा आधारस्तंभ!

📌 प्रेमाचा माणूस, हक्काचा माणूस – के. अभिजीत दादा!

समाजात प्रेमाला कोणत्याही अडथळ्याविना स्वातंत्र्य मिळावे, जाती-धर्माच्या चौकटींना भेदून प्रत्येक प्रेमी जोडप्याला हक्काचा आधार मिळावा, यासाठी झटणारे के. अभिजीत म्हणजे “Right To Love” चळवळीचा आधारस्तंभ!

अभिजीत यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक विवाह घडवून आणले आहेत, ज्यामध्ये अंतरजातीय विवाह आणि समलिंगी विवाहांचाही समावेश आहे. प्रेम करणाऱ्या जोडप्यांना आधार देताना त्यांनी कधीही कोणाकडून आर्थिक मोबदला घेतला नाही.

अभिजीत सोबत काम करताना अनेकांना जीवनाचे नवे दृष्टिकोन मिळाले आहेत. समाजाच्या विरोधात जाऊनही प्रेमाच्या नात्यांना हक्क देण्यासाठी झटणाऱ्या अभिजीत चे कार्य समाजासाठी एक आदर्श आहे.

के. अभिजीत यांच्या सामाजिक कार्याला सलाम!

साहस Times परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments