Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रचाळीस लाख द्या; MPSC चा पेपर मिळणार परीक्षेच्या दोन दिवस आधी! विद्यार्थ्यांना...

चाळीस लाख द्या; MPSC चा पेपर मिळणार परीक्षेच्या दोन दिवस आधी! विद्यार्थ्यांना आलेल्या फोनकॉलमुळे उडाली खळबळ

[ad_1]

काय आहे घटना ?

नागपूरमधील एका कन्सलटंसीने अनेक मुलांना फोन करून आमिष दाखवले आहे. याचे फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. काही विद्यार्थ्यांना एका कन्सलटंसीकडून फोन आल्याचे संबंधित विद्यार्थ्यानी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या साठी त्यांनी ४० लाख रुपयांची मागणी केली असल्याचं देखील पुढं आलं आहे. कॉल आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, तुम्ही ‘गट ब’च्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्या साठी एक खास ऑफर आहे. आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका २ फेब्रुवारी पूर्वी तुम्हाला देऊ. मात्र, त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. जर तुम्हाला विश्वास नसेल तर या परीक्षेला एक ही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपली मूळ कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. काही विद्यार्थ्यांनी हे कॉल रेकॉर्ड केले आहेत. तसेच यात संबंधीत विद्यार्थी तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशीही विचारणा केली असून समोरच्या व्यक्तिने मी तुमचा कोणी मित्र नाही, तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात. तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे. फक्त या फोन कॉलबद्दल कोणाला काही बोलू नका, असे सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments