Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'चा प्रादुर्भाव; महापालिकेच्या विविध उपाययोजना सुरू

पुण्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चा प्रादुर्भाव; महापालिकेच्या विविध उपाययोजना सुरू

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड आणि धायरी या गावांमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (GBS) चे रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने महापालिकेने या भागाला ‘GBS बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात चार न्यूरोलॉजिस्ट सेवा देण्यास तयार झाले असून, एका डॉक्टरने काम सुरू केले आहे. बाधित रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार असून, पात्र नसलेल्या रुग्णांना देखील एक लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे.

टँकर चालकांसाठी विशेष बैठक

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी खासगी टँकर चालकांची बैठक घेऊन त्यांना २५ किलो ब्लिचिंग पावडर वितरित केली आहे. टँकरमधील पाणी स्वच्छ करण्यासाठी या पावडरचा योग्य प्रमाणात वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नोडल अधिकारी नियुक्त, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू

महापालिकेने संशयित रुग्णांची माहिती एकत्र करण्यासाठी ‘GBS आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ सुरू केला आहे. या कक्षाशी खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल:
📞 020-25506800, 020-25501269, 020-67801500

बाधित गावांत औषध वाटप सुरू

महापालिकेच्या आरोग्य विभागाने बाधित रुग्णांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शहरातील रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच बाधित गावांमध्ये ‘मेडिक्लोर’च्या ३०,००० बाटल्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

महापालिकेच्या या उपाययोजनांमुळे ‘GBS’ संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments