Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशBudget 2025 Expectations : 10 लाख रुपयांपर्यंतची इनकम होऊ शकते टॅक्स फ्री!...

Budget 2025 Expectations : 10 लाख रुपयांपर्यंतची इनकम होऊ शकते टॅक्स फ्री! पण कसं?

Budget 2025 Expectations : 10 लाख रुपयांपर्यंतची इनकम होऊ शकते टॅक्स फ्री! पण कसं?

[ad_1]

Budget 2025 Income Tax Expectations: बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा असतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. टॅक्समध्ये किती सुट मिळते याकडे सर्वांचे लक्ष असते.  विशेषतः नोकरदार आणि मध्यमवर्गीय आयकर कपातीच्या घोषणेची वाट पाहत आहेत. यंदाच्या बजेटनंतर  10 लाख रुपयांपर्यंतची इनकम टॅक्स फ्री होऊ शकते. मात्र, हे कसं काय शक्य आहे? जाणून घेऊया बजेटचे गणित.

यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना फार अपेक्षा नाहीत. अर्थमंत्री जुनी करप्रणाली रद्द करण्याची घोषणा करु शकतात. नव्या करप्रणालीतील टॅक्समध्ये अधित सूट देऊ शकतात. करात कपात करुन अर्थमंत्री करदात्यांना भेट देऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. 

नव्या कर प्रणालीचा अधिक करदात्यांना मोठा फायदा होऊ शकतो. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून आयकर कमी करण्यावरही चर्चा सुरू आहे. यावेळी अर्थमंत्री अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅब बदलून आयकरात दिलासा देतील, अशी अपेक्षा करदात्यांकडून केली जात आहे. अर्थसंकल्पात कर सवलतीची घोषणा झाल्यास याचा मोठा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे. 

दरम्यान  बचतीची एक सोपी पद्धत आहे ज्यामुळे 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर वाचवता येवू शकतो. अर्थसंकल्पात करात सवलत मिळाली नाही तरी 10 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न या बचत पद्धतींद्वारे करमुक्त करता येऊ शकते. सध्याच्या कर प्रणालीमध्ये दोन प्रकारच्या कर व्यवस्था आहेत. जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था. जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंत आणि नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही. यानंतरच्या उत्पन्नावर वेगवेगळ्या स्लॅबमध्ये कर आकारला जातो, परंतु असे बरेच मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने आयकर दायित्व कमी करू शकता किंवा शून्य देखील करू शकता. वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असले तरी ते पूर्णपणे टॅक्स फ्री होऊ शकते. 

जुन्या कर प्रणालीमध्ये, वैयक्तिक बचतीसाठी कर सवलत उपलब्ध आहे, तर नवीन प्रणालीमध्ये, अशी वजावट उपलब्ध नाही. नव्या करप्रणालीत फक्त 75 हजार रुपयांची कर सवलत आहे. 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर जुन्या करांतर्गत कर भरल्यास,  50 हजार रुपयांची सूट मिळते.  80C अंतर्गत ज्यामध्ये PPF, EPF, SSY, NCS इत्यादी बचत योजनांचा समावेश आहे. 1.50 लाख रुपयांची वजावट किंवा करमुक्त उत्पन्न उपलब्ध आहे.  

80D अंतर्गत, आरोग्य विमा प्रीमियमवर 25 हजार रुपयांची बचत होते.   80TTA अंतर्गत, बचत बँक खात्यात मिळालेल्या व्याजावर 10,000 रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते.   24(b) अंतर्गत, गृहकर्जाच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. 80CCD(1B) अंतर्गत, NPS मध्ये अतिरिक्त योगदानावर 65 हजार रुपयांची वजावट आहे. सर्व गोष्टी एकत्र केल्या तर वार्षिक उत्पन्न एकूण 5 लाख रुपयांनी कमी करता येवू शकते. करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये असेल, ज्यावर जुन्या कर प्रणालीनुसार आयकराची गणना केली जाऊ शकते.  

2.50 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% कर जवळपास 12500 रुपये असतो. आता आयकराच्या कलम 87A अंतर्गत प्रत्येक करदात्याला 12500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. अशाप्रकारे 10 लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री करता येवू शकते. आयकर नियमांनुसार, कलम 87A अंतर्गत सूट फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments