Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रवृद्ध महिलेला काळं फासलं, मूत्र पाजलं, मिरचीची धुरी देत हात बांधून काढली...

वृद्ध महिलेला काळं फासलं, मूत्र पाजलं, मिरचीची धुरी देत हात बांधून काढली धिंड! अमरावतीच्या चिखलदारा येथील घटना

[ad_1]

काय आहे घटना ?

काळमी नंदुराम शेलूरकर (वय ७७) असे पीडित महिलेचे नाव आहे. काळमी सेलूकर ही वृद्धा रेट्घाखेडा येथे घरात एकटीच होती. मुलगा राजकुमार व सून शामू हे बाहेरगावी कामावर असतात, तर त्यांची दोन मुले शिक्षणाकरिता वसतिगृहात राहतात. ही महिला ३० डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता उठून प्रातर्विधीसाठी गेली होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या सायबू चतुर व त्याच्या पत्नीने या महिलेला पाहताच तिला पकडून ठेवले व पोलिस पाटील बाबू जामूनकर याला बोलावले. आमच्या घराच्या बाजूला जादूटोणा करीत असल्याचा आरोप त्यांनी काळमीवर केला. बाबू जामूनकर याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायबू चतुर, साबूलाल चतुर, रामजी चतुर व इतरही ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी मरण केली. या महिलेला दोरखंडाने बांधत लोखंडी साखळीचे चटके दिले. एवढेच नाही तर त्यांनी या वृद्ध महिलेला मिरचीची धुरी दिली. तिच्या गळ्यात चप्पल बुटांचा हार घातला. तिला मानवी मूत्र पाजले. तिला मारहाण केली. व तिची धिंड पूर्ण गावातून काढली. हा सर्व प्रकार ग्रामस्त पाहत होते. मात्र, या महिलेच्या मदतीला कोणी आले नाही. गावातील पोलीस पाटील बाबुभाई नावाच्या व्यक्तिने हे क्रूरकर्म केलं. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments