Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रकृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य: बारामतीत शरद पवार-अजित पवार एका व्यासपीठावर

कृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य: बारामतीत शरद पवार-अजित पवार एका व्यासपीठावर

 बारामती : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने १६ ते २० जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार, १५ जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे.

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संकल्पनेवर आधारित असून, हे राज्यातील आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीचा अनुभव देणारे प्रदर्शन ठरणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून हे प्रदर्शन प्रात्यक्षिकांवर आधारित आयोजित केले जात आहे. यंदाच्या प्रदर्शनाबद्दल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या कार्यक्रमामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने, राज्यभरातील राजकीय आणि कृषी क्षेत्राचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

बारामतीतील हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान आणि प्रगतीची एक संधी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments