Thursday, September 3, 2026
Homeसाताराबारामती-फलटण एसटी बसला आग, प्रवासी सुखरूप; जिवीत हानी टळली

बारामती-फलटण एसटी बसला आग, प्रवासी सुखरूप; जिवीत हानी टळली

फलटण  :- महादेवनगर, फलटणजवळ बारामतीवरून फलटणला येणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली आहे. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही.

आगीची घटना घडल्यावर चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे.

ही घटना फलटणपासून जवळ असलेल्या महादेवनगर येथे घडली. एसटी महामंडळाने या घटनेची दखल घेतली असून बसच्या तांत्रिक दोषांबाबत चौकशी सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments