Saturday, September 12, 2026
Homeसातारा'दारू नको, दूध प्या' उपक्रमाने नववर्षाच्या स्वागताला वेगळा संदेश

‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमाने नववर्षाच्या स्वागताला वेगळा संदेश

फलटण :1 जानेवारी 2025
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, फलटण आणि मुधोजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या स्वागतासाठी आरोग्य जागृती अभियान अंतर्गत ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी समितीच्या ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ या मोहिमेचा एक भाग म्हणून 31 डिसेंबर रोजी मुधोजी महाविद्यालयात हा उपक्रम पार पडला.

उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना दारू व इतर व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. यानंतर सर्व उपस्थितांना दूध वाटप करण्यात आले. “नववर्षाची सुरुवात दारूने नव्हे तर दुधाने करा,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, उपप्राचार्य प्रा. ज्ञानदेव देशमुख, प्रा. डॉ. प्रभाकर पवार, प्रा. रणधीर मोरे, प्रा. सौ. नीलम देशमुख आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती फलटणचे आनंद देशमुख, आत्माराम बोराटे, सचिन काकडे, मंदाकिनी गायकवाड, मोहिनी भोंगळे आणि आरती कांबळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

कार्यक्रमाने नववर्षाच्या स्वागताला आरोग्यदायी आणि प्रेरणादायी दृष्टिकोन दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments