Tuesday, September 22, 2026
Homeसाताराफलटण शहराला स्वच्छ पाण्यासाठी माजी खासदार व आमदारांची पाहणी; 'ऑफिसर्स क्लब' स्थापनेसाठी...

फलटण शहराला स्वच्छ पाण्यासाठी माजी खासदार व आमदारांची पाहणी; ‘ऑफिसर्स क्लब’ स्थापनेसाठी सूचना

फलटण :-  माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशन आणि रेस्ट हाऊसची पाहणी केली. फिल्टरेशन प्लांटची दुरवस्था पाहून त्यांनी नगरपालिकेचे प्रशासक निखिल मोरे यांना तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

पाहणी दरम्यान, प्लांटमधील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन सिस्टीम बंद असल्याचे लक्षात आले. पाण्यात शैवाळ तयार झाले असून, स्वच्छतेच्या अभावामुळे जागेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. जुन्या प्रशासक आणि समित्यांच्या दुर्लक्षामुळे रेस्ट हाऊसची अवस्था ‘रामसे बंधूंच्या पुरानी हवेली’सारखी झाली असल्याचे मत माजी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केले.

‘ऑफिसर्स क्लब’ स्थापनेसाठी सूचना
माजी खासदारांनी या जागेला ‘ऑफिसर्स क्लब’ घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला, जेणेकरून येथे राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि जागेची स्वच्छता व देखरेख उत्तम प्रकारे राखली जाईल.

आमदार सचिन पाटील यांनी फिल्टरेशन प्लांट सुरू करण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी पाण्याचा ‘पीएच’ स्तर सुधारण्यात येण्याची गरज असल्याचे सांगितले, जेणेकरून पाण्यामुळे होणाऱ्या रोगराईला आळा बसेल.

आमदारांनी या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याचेही निर्देश दिले, जेणेकरून बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नसेल व प्लांट सुरक्षित राहील. तसेच रेस्ट हाऊस पुनः स्वच्छ करून ‘ऑफिसर्स क्लब’मध्ये रूपांतरित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी प्रशासक निखिल मोरे यांना केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments