Amir Khan: आमचे आजही एकमेकांवर प्रेम आहे; किरण रावसोबतच्या नात्याबद्दल आमिर खानचा खुलासा

0
10
Amir Khan: आमचे आजही एकमेकांवर प्रेम आहे; किरण रावसोबतच्या नात्याबद्दल आमिर खानचा खुलासा


बॉलिवूडमधील परफेक्ट कपल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या आमिर खान आणि किरण रावने घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला. मात्र, घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण हे एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल लाईफ, दोघेही नेहमीच एकमेकांसोबत असतात. घटस्फोटानंतर त्यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता एका मुलाखतीमध्ये आमिरने या चित्रपटाच्या यशाचे श्रेय किरण रावला दिले आहे. इतकंच नाही तर आमिरने असंही सांगितलं की, ‘आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.’



Source link