‘मी तर शपथ घेणार आहे’ या अजित पवारांच्या मिश्कील विधानावर एकनाथ शिंदेंचा चिमटा; म्हणाले, यांना सकाळ-संध्याकाळचा अनुभव

0
17
‘मी तर शपथ घेणार आहे’ या अजित पवारांच्या मिश्कील विधानावर एकनाथ शिंदेंचा चिमटा; म्हणाले, यांना सकाळ-संध्याकाळचा अनुभव


देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानंतर तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारले की, फडणवीस यांच्यासोबत तुम्ही आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार आहात का? त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘तुम्हाला एवढी घाई कशासाठी? हे आज सायंकाळपर्यंत कळेलच. उद्या संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार आहे. शिंदे बोलत असतानाच अजित पवार मध्येच म्हणाले की, मी तर शपथ घेत आहे, एकनाथ शिंदे यांना निर्णय घ्यायचा आहे.



Source link