Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशViral News : धक्कादायक! डॉक्टरांकडे न नेता व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करून केली...

Viral News : धक्कादायक! डॉक्टरांकडे न नेता व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करून केली पत्नीची प्रसूती; गुन्हा दाखल

Viral News : धक्कादायक! डॉक्टरांकडे न नेता व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करून केली पत्नीची प्रसूती; गुन्हा दाखल

[ad_1]

Viral News : चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. एका जोडप्याने दवाखान्यात न जाता घरातच मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ही माहिती विचारून ही डिलिव्हरी करण्यात आली आहे.  ही घटना व्हायरल झाल्यावर पोलिसांना या प्रकरणी तपास करावा लागला.  डॉक्टरांचा सल्ला न घेताच या दाम्पत्याने घरीच बाळाला जन्म दिल्याचा आरोप आहे. या साठी ‘होम बर्थ एक्सपीरियंस’ या ग्रुपवर माहिती विचारून पतीने पत्नीची घरीच प्रसूती केली. या ग्रुपमध्ये तब्बल एक हजारांहून अधिक जण सदस्य आहेत. या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांनी जशी माहिती दिली त्यानुसार या  जोडप्याने  प्रसूती केली. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली असून या प्रकरणी नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments